![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/crime-news-696x447.jpg)
गर्भवती प्रेयसीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जाळल्याची धक्कादायक घटना गोंदियात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शकील मुस्तफा सिद्दीकी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
सिद्दीकीचे 18 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर सिद्दीकीने तिच्या प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र तरुणीला त्याच्यासोबत संबंध ठेवायचे होते. याच कारणातून तरुणीपासून पिच्छा सोडवण्यासाठी सिद्दीकीने तिला जंगलात निर्जन ठिकाणी नेऊन तिची हत्या केली. मग पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह जाळला.
पोलिसांना जंगलात जळालेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. तपासाअंती धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.