महाविकास आघाडीचे सरपंच, पदाधिकारी ज्या गावात असतील त्या गावाला एक रुपयाचाही निधी द्यायचा नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील पदाधिकारी सभेत ते बोलत होते.
”येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजनचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा, अशी खुली धमकी भाजपचे कुडाळचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.