![mobile 1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mobile-1-696x447.jpg)
दहावीची परिक्षा तोंडावर आलेली असताना मुलगी मोबाईल घेऊन बसलेली पाहून आई तिच्यावर भडकली. मोबाईल ठेवून अभ्यास कर, असे सांगितले म्हणून रागाच्या भरात मुलीने थेट इमारतीच्या 20 व्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. अवंतिका चौरसिया असे त्या मुलीचे नाव असून ती बंगळुरूतील कादूगोडी भागात आई वडिलांसोबत राहायची.
चौरसिया कुटुंबा मूळचे मध्यप्रदेशचे मात्र अवंतिकाच्या वडिलांच्या नोकरीसाठी ते बंगळुरू येथे स्थायिक झाले होते. अवंतिका ही दहावीत शिकत होती. नुकत्याच झालेल्या प्रिलीम परिक्षेत तिला चांगले मार्क मिळाले नव्हते. तसेच तिच्या बोर्डाच्या परिक्षा देखील 15 फेब्रुवारीपासून सुरू होत होत्या.
मंगळवारी अवंतिका अभ्यास सोडून तिच्या मोबाईलवर खेळत होती. त्यावेळी तिच्या आईने तिला पाहिले व त्यावरून तिला ओरडली. तोच राग डोक्यात ठेवून अवंतिकाने राहत्या इमारतीच्या 20 व्या माळ्यावरून उडी घेतली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.