![neehar - 2025-02-13T111317.811](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T111317.811-696x447.jpg)
सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपले चालणे हे खूप कमी झालेले आहे. त्यामुळेच नानाविध राेगांची सुरुवात शरीरामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या घडीला आजूबाजूला सजगपणे पाहिल्यास हृदयरोग, वजनवाढ, मधुमेह हे आजार जवळपास पाचपैकी चार जणांना असतात. चाळीशीच्या वयोगटामध्ये सध्याच्या घडीला मधुमेहाची गतीने वाढ होताना दिसत आहे. यावरच उपाय म्हणून तज्ज्ञांच्या मते दिवसातून किमान अर्धा तास चालण्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. दिवसातून किमान अर्धा तास आपण चाललो तर आपण भविष्यातही निरोगी राहू असा सल्ला आता तज्ज्ञ देताहेत. अर्धा तास चालण्याचे शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. टाइप-२ मधुमेह, हृद्यविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, जडत्व, कर्करोग आदी रोगांवर आपण फक्त अर्धा तासाच्या चालण्याने मात करू शकतो.
हाडांच्या स्नायू साठी चालणं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. अनेक महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये सध्याच्या घडीला ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वाढू लागला आहे. या जोडीला सर्कोपनिया या रोगामुळे स्नायूंची वजन कमी होऊन काम करण्याची क्षमताही कमी होऊ लागली आहे. या सर्व आजारांवर मात करण्यासाठी अर्धा तास चालणे हा एक बेस्ट पर्याय आहे. रोज किमान अर्धा तास चालण्यामुळे, मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मानसिक शांती मिळते. तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते.
दिवसातून ३० मिनिटे चालण्यामुळे, वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबरीने हृद्याचे आरोग्य उत्तम होण्यास मदत होते. चालणे कसे असावे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. तर सलग ३० मिनिटे चालणे हे गरजेचे आहे. थोडे थांबून पुन्हा चालणे चालू ठेवायचे हे असे योग्य नाही. आरोग्यासाठी चांगला फायदा हवे असल्यास, न थांबत तीस मिनिटे चालायलाच हवे. पूर्वापार चालत आलेल्या विविध म्हणी आपणास पाठ आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला ‘चालाल तर वाचाल’ ही नवीन म्हण आपण आपल्यासाठी तयार करणे आता क्रमप्राप्त आहे.
(कोणतेही उपाय किंवा उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)