![anshuman](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/anshuman--696x447.jpg)
ठाण्यातील एका ब्रँडेड शूजच्या दुकानातील सेल्समनने एका मराठी अभिनेत्याला वाईट वागणूक दिल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता व हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमात झळकलेला अभिनेता अंशुमन विचारे याच्यासोबत हा प्रकार घडला असून त्याच्या पत्नीने या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
अंशुमन व त्याची पत्नी पल्लवी हे ठाण्यातील सुपरबाय या शॉपमध्ये गेले होते. तिथे त्या दुकानातील सेल्ममॅनने अंशुमनला वाईट वागणूक दिल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ‘हे सुपरबाय शॉप आहे. इंस्टाग्रामवरची रिल पाहून आम्ही इथे आलो. 70 टक्के सवलत देण्यात आली आहे अशी जाहिरात या दुकानाने केलेली आहे. पण तसं काही नाहीए. या दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्याची अजिबात पद्धत नाहीए. वेअर हाऊसमधून शूज आणून दाखवावे लागले म्हणून तो अंशुमनला वाईट पद्धतीने बोलला. तुम्हाला आधी सांगता येत नाही का, तुमच्यामुळे मला खालून शूज आणून दाखवावे लागला, असं वगैरे तो अंशुमनला बोलला’, असे त्याच्या पत्नीने या व्हिडीओत सांगितले.