सांगलीतील फूड्स प्रायव्हेट कारखान्याच्या गोडाऊनला गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत परदेशी जाणारा माल आणि गोडाऊन जळून खाक झाले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पेठ नाका नेर्ले रोड येथील आदिती फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परिसरात दूरवर आगीचे लोळ उठले होते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 5 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.