![neehar - 2025-02-13T092817.162](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T092817.162-696x447.jpg)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T092848.476.jpg)
सध्याच्या घडीला अनेक कंपन्या वर्क फॉर्म होमची सुविधा देतात. या सुविधेमुळे आपण घरातूनच कार्यालयाचे काम करू लागलोय. अशावेळी डोळ्यांचे आरोग्य कसे निरोगी राखायचे याकडेही लक्ष द्यायला हवे. नुसते लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर बसून आपण असल्यामुळे डोळे थकतात आणि डोळ्यांवर ताण येतो.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी अगदी साधे सोपे घरगुती उपाय पाहूया, ज्यामुळे आपल्या डोळ्यांनाही चांगला आराम मिळेल.
डोळ्यांवरील ताण दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे गुलाबजलाचा वापर करणे. डोळ्यांचा थकवा गुलाबजलच्या वापराने लगेच दूर होतो. थोड्याशा पाण्यात गुलाबजल मिसळावे. त्यानंतर कापूस भिजवावा. त्यानंतर तो कापूस किमान पाच ते सात मिनिटे आपल्या डोळ्यांवर तसाच ठेवावा. हा प्रयोग तुम्ही नक्की करा. बघा तुमच्या डोळ्यांना पाचच मिनिटांमध्ये किती आराम मिळेल. डोळ्यांचा थकवा लगेच दूर करण्यासाठी हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे.
डोळ्यांवर थंड पाणी मारताना एकदम जोराने कधीच मारू नये. त्याने डोळ्यांना त्रास होण्याचा, संभव असतो. हळुवारपणे थंड पाणी मारल्यामुळे, डोळ्यांना अधिक आराम मिळतो. कामातून ब्रेक घेऊन, किमान दोन ते तीन तासांनी डोळ्यांवर थंड पाणी मारावे. थंड पाणी मारल्यामुळे डोळ्यावरील ताण दूर होईल तसेच, जळजळही कमी होते.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)