![jee fail (2)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jee-fail-2-696x447.jpg)
जेईई परीक्षेत नापास झाल्याने नैराश्येतून अकरावीच्या विद्यार्थीनीने जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशात उघड झाली आहे. आदिती मिश्रा असे तरुणीचे नाव असून ती अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. मृत्यूपूर्वी आदितीने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात “आई बाबा माफ करा, मी ते करू शकले नाही”, असे लिहित आई-वडिलांची माफी मागितली आहे.
आदिती गोरखपूरमधील बेतियाहाटा येथील मोमेंटम कोचिंग सेंटरमध्ये आदिती गेली दोन वर्षे जेईईची तयारी करत होती. तर तेथील सत्यदीप गर्ल्स हॉस्टेलमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती. जेईई परीक्षेत नापास झाल्यानंतर आदिती बुधवारी सकाळी आई-वडिलांसोबत बोलली. वडिलांना मोबाईल रिचार्ज करण्यास सांगितले. यावेळई तिची रुममेट बाहेर गेली होती.
काही वेळाने तिची रुममेट परतली आणि दार वाजवू लागली. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. रुममेटने आत डोकावून पाहिले असता आदिती लटकलेल्या अवस्थेत दिसली. रुममेटने तात्काळ वॉर्डनला कळवले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.