राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांची क्लीन चिट, गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही नाही

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याला पोलीस आयुक्तांनी क्लीन चिट दिली आहे. दोन्ही व्हिडीओ क्लिप पोलिसांनी तपासल्या आहेत. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही, असे अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोलापूरकरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोलापूरकरने वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.