![supreme court](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/supreme-court-696x447.jpg)
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱया याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त 18 फेबुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालय म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना काही झाले तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून दिला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.
राष्ट्रीय होमियोपॅथी आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती रद्द
राष्ट्रीय होमियोपॅथी आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. ही नेमणूक कायद्यानुसार नसल्याचे सांगत अध्यक्ष डॉ. अनिल खुराना यांना एक आठवडय़ाच्या आत पायउतार होण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खुराना यांची नियुक्ती योग्य ठरवण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. डॉ. खुराना यांनी कोणतेही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत. तसेच राष्ट्रीय होमियोपॅथी आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.