1984 ची दंगल – तब्बल 41 वर्षांनी सज्जनकुमार दोषी

1984 च्या शीख दंगलप्रकरणी न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्ट येत्या 18 फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणार आहे. तब्बल 41 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. 1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या चिथावणीवरूनच जमावाने दोन शिखांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.