अख्ख्या कुटुंबाला केले डिजिटल अरेस्ट, 1 कोटी उकळले

देशात डिजिटल अरेस्ट करून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका कुटुंबाला पाच दिवस डिजिटल अटक करून त्यांच्याकडून एक कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रभान पालिवाल या नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केलीय.  फेब्रुवारी रोजी एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. या व्यक्तीने सिमकार्ड ब्लॉक करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंबईतील एका पोलीस स्टेशनमधून व्हिडीओ कॉल केला. तुम्ही पैसे लुबाडले असून तुमच्याविरोधात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल आहेत. सीबीआय मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात तुमची चौकशी करत आहे, असे सांगितले. व्हिडीओ कॉलनंतर संपूर्ण कुटुंबाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले. धमकी देवून पाच दिवसात आरोपींनी एक कोटी ० लाख रुपये उकळले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.