![deepika](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/deepika-696x447.jpg)
परीक्षा पे चर्चा 2025 चा दुसरा भाग मंगळवारी थेट प्रक्षेपित करण्यात आला. यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने सहभाग घेतला. यावेळी तिने तिच्या शालेय जीवनातील अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. ती म्हणाली. लहानपणी मी खूप मस्तीखोर होते. मी नेहमी टेबल, खुर्ची आणि सोफ्यावर चढायची आणि उडय़ा मारायची.
परीक्षेच्या वेळी मी प्रचंड तणावाखाली असायची. कारण, माझे गणित खूप कच्चे होते. आजही माझे गणित अतिशय कच्चेच आहे, अशा अनेक आठवणी दीपिकाने विद्यार्थ्यांशी शेअर केल्या. परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल काही टीप्सही दिल्या. परीक्षेच्या वेळी तणावाखाली जाणे स्वाभाविक आहे. परंतु, या तणावात आपण कशाप्रकारे वागतो. कशाप्रकारे अडचणींवर मात करतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे दीपिका म्हणाली.