![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/crime-news-3-696x447.jpg)
राजस्थानच्या कोटा येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलाचे वय 18 वर्षे आहे. पीजीच्या खोलीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली. मागील दीड वर्षांपासून तो नीट यूजीसी परीक्षेची तयारी करत होता. खोलीत कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मुलावर रँगिंग झाले की प्रेमप्रकरण आहे, यासह अन्य सर्व बाजुंचा पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होण्याचे प्रकार वाढले आहेत.