![TVS Jupiter EV and Suzuki Burgman EV](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/TVS-Jupiter-EV-and-Suzuki-Burgman-EV-696x447.jpg)
हिंदुस्थानात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. बाजारात अनेक नवीन मॉडेल्स येत आहेत. यातच चांगली गोष्ट म्हणजे आता कंपन्या बजेट फ्रेंडली मॉडेल्स बाजारात आणत आहेत. आता बाजारात पेट्रोल आणि स्कूटरच्या किमतीत फारसा फरक उरलेला नाही. यातच आपण देशात लॉन्च होणाऱ्या अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत…
TVS Jupiter EV
TVS मोटर्सने ऑटो एक्सपोमध्ये आपली पहिली CNG स्कूटर सादर केली. आता बातमी समोर येत आहे की, कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्टानुसार, कंपनी फक्त ज्युपिटर ईव्ही बाजारात सादर करू शकते. सध्या बाजार उपलब्ध असलेल्या ज्युपिटरच्या तुलनेत, नवीन ईव्ही ज्युपिटरच्या डिझाइनमध्ये नवीनता दिसून येते.
सध्या या स्कूटरची किंमत, बॅटरी आणि रेंज याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र असं बोललं जात आहे की, या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आणि रेंज कंपनीच्या सध्याच्या iqube इलेक्ट्रिक स्कूटरच्या आसपास असू शकते.
Suzuki Burgman EV
सुझुकी आपली लोकप्रिय स्कूटर Burgman चे इलेक्ट्रिक व्हर्जन हिंदुस्थानात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ही स्कूटर फिक्स्ड बॅटरीसह येईल, मात्र याची रेंज सुमारे 90km-110km असू शकते. तसेच याची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. Burgman EV च्या डिझाइनमध्ये थोडे बदल केले जाऊ शकतात. याच्या फीचर्सबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.