रणवीर इलाहाबादिया ते समय रैना, सायबर सेलने आतार्यंत 30 जणांविरुद्ध दाखल केले गुन्हे

कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. या शो च्या मागच्या भागात यूट्युबर रणवीर इलाहाबादियाच्या भट्टेच्या कमेंटने खळबळ माजली. इलाहाबादीने या शो मध्ये आई-वडिल आणि कुटुंबाबाबत अश्लील टिप्पण्या केल्या. यानंतर सामान्य लोकांमध्ये नाही कलाकारांनीही इलाहाबादीच्या वक्त्यव्याचा निषेध केला. समय रैना आणि रणवीर इलाबादीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर अपूर्व माखीजा याची देखील चौकशी पोलिसांनी केली.

अपूर्व माखिजानेही ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये वाईट टिप्पणी केली होती. तसेच शोमधील एका स्पर्धकाला शिवीगाळही केली होती. सायबर पोलिसांनी अपूर्वाचा जबाब नोंदवला. सुमारे दोन तास अपूर्वाची चौकशी केली.

अपूर्वासह आशिष चंचलानी यांचेही जबाब काल नोंदवण्यात आले. मुंबई पोलीस शो मध्ये उपस्थित असलेल्या सर्व सहभागी झालेल्यांची चौकशी करत आहेत.

एकूण 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनिल कुमार पांडे यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसात इंडियाज गॉट लेटेंट या शोविरुद्ध एफआयआर दाखल केला. या शोच्या सर्व एपिसोड तपासल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. एकूण 30 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून हे सर्व जण समयच्या शोचे जज होते.