अभिनेता सना देओलचा जाट चित्रपट येत्या 10 एप्रिलला सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गोपीचंद मालिनेनीच्या या चित्रपटात सनी देओल सह सहा विलेनचा समावेश असणार आहेत. अशा परिस्थितीत, या चित्रपटाच्या कमाईसाठी एका मोठ्या प्लॅनसह, सनी देओल आणि निर्मात्यांनी शाहरुख खानची स्ट्रॅटजी वापरली आहे. या बाबतीत, सनी देओल शाहरुक खान पेक्षा तीन पावले पुढे गेला आहे.
2024 मध्ये सनी देओलचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तसेच सनी देओलने या वर्षी नव्या चित्रपटासह पुनरागमन केले आहे. त्यामुळे सनी देओलचे पुनरागमन देखील उत्तम असले पाहिजे. म्हणूनच सनी देओलने बॉक्स ऑफिसवर जाट चित्रपटासाठी 1000 कोटी रुपयांची प्लॅनिंग केली आहे. यादरम्यान 2023 मध्ये शाहरुख खानचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता जाट चित्रपटासाठी सनी देओलची 1000 कोटी रुपयांचा असलेला प्लॅन यशस्वी होतो की नाही हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.