माजी मंत्र्याचा मुलगा तीन तासांत सापडतो, पण कृष्णा आंधळे का सापडत नाही? बीडच्या जनतेचा संतप्त सवाल

एका मंत्र्याचा गायब झालेला मुलगा अवघ्या तीन तासांत सापडतो. बंगालच्या उपसागरावरून त्याला पुण्यात माघारी आणले जाते. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे दोन महिने उलटून गेले तरीही सापडेना. कोणाची इच्छाशक्ती कमी पडते? असा संतप्त सवाल बीड जिल्हावासीयांकडून व्यक्त केला जात आहे.

स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. या हत्याकांडाचा तपास पोलीस प्रशासन, सीआयडी, एसआयटी, न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. चार यंत्रणा कामाला असतानाही कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागेना. एकीकडे कृष्णा आंधळे सापडत नसताना दुसरीकडे मात्र एका माजी मंत्र्याचा मुलगा गायब झाल्याची तक्रार पोलिसांत जाते. संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या दोन तासामध्ये त्या माजी मंत्र्याचा मुलगा सापडतो. मात्र खून केलेला कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागेना. सामान्य जनतेची हीच अवस्था आणि व्यवस्था आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.