Share Market Down – सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले!

शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील या घसरणीला स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेने निर्णय कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये मंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशीही घसरण सुरूच आहे. शेअर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स 274.56 अंकांनी आपटला. पाऊण तासात शेअर बाजार 800 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 78.45 अंकांनी घसरला. मुंकेश अंबानींच्या रिलायन्सच्या शेअरचे भाव 3 टक्क्यांनी घसरले. झोमॅटोचे शेअरही घसरले.

6 लाख कोटी बुडाले!

बीएसई लिस्टेड स्टॉक्स मार्केट कॅपिटलाइजेशन 402.12 लाख कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या सत्रात मार्केट कॅपिटलाइजेशन 408.52 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज बाजार उघताच गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात घसरल्याने मुंकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर 3.18 टक्क्यांनी घसरून 1194 रुपयांवर भाव आला. अदानींच्या अदानी पोर्ट्सचे शेअरही 2.6 टक्क्यांनी घसरले. पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, अॅक्सीस बँक, आयटीसी, एशियन पेंट्स, बजाज फायनॅन्स, टाइटन, एसबीआय, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टीलच्या शेअरही घसरले.