![gbs virus](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/gbs-virus-696x447.jpg)
पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुइलेन बॅरी सिंड्रोम(जीबीएस)ने शिरकाव केला आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळा येथील 53 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जीबीएसमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मयत रुग्ण वडाळा येथील रहिवासी असून पालिकेच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा रुग्ण आजारी होता. नायर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान, पालघरमधील दहावीच्या विद्यार्थिनीलाही जीबीएसची लागण झाली आहे. मुलीला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे, असे डॉक्टरांनी नमूद केले.