![Mehul Choksi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/Mehul-Choksi-696x447.jpg)
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालत फरार झालेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असून बेल्जियममध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्या आजारपणाची माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी चोक्सी यांना अर्ज दाखल करायचा आहे, अशी माहिती चोक्सी यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात दिली.
पीएनबी बँकेची सुमारे 13 हजार 400 कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीविरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या याचिकेवर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी चोक्सी यांच्या वतीने अॅड. विजय अग्रवाल यांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की, आपले अशील मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असून बेल्जियममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायची असून त्याबाबतचा अर्ज त्यांना सादर करायचा आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.