![EKNATH SHINDE CM](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/02/EKNATH-SHINDE-CM-696x447.jpg)
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या असलेल्या नाराजीचे पडसादही या बैठकीत उमटले. शिंदेंच्या खात्यांमध्ये होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाबाबत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत आपली नाराजी केली.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर एकनाथ शिंदेंची नियुक्ती न झाल्याबाबतही पडसाद उमटले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला तिढाही संपलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर शिंदे सेनेने दावा कायम ठेवल्याचे समजते.