![mahesh nagulwar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahesh-nagulwar-696x447.jpg)
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी 60 या नक्षलविरोधी पथकातील एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार (39) असे या शहीद जवानाचे नाव आहे. आज दिरंगी-फुलणार जंगल परिसरात ही चकमक उडाली.
गडचिरोली पोलिसांचे 18 जवानांचे पथक आणि सीआरपीएफच्या दोन पथकाच्या जवानांनी आज या परिसराला घेराव घातला. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार गेला. चकमकीदरम्यान नागुलवार याला गोळी लागली. त्याला तत्काळ हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात आली. परंतु, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, महेश यांच्या निधनामुळे दोन मुलींचे पितृछत्र हरपले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 2012 मध्ये ते पोलीस दलात भरती झाले होते.