![european-union-parliament](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/01/european-union-parliament-696x447.jpg)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनीयमसह विविध मालांवर 25 टक्के आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाला युरोपियन महासंघातील 27 देशांच्या आघाडीने कडाडून विरोध केला आहे. अतिरिक्त आयात शुल्क व्यापारासाठी अत्यंत वाईट असून ग्राहकांसाठी अत्यंत घातक आहे, असे युरोपियन महासंघाचे प्रमुख हर्सुला वोन डेर लेयेन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या अन्यायकारक अतिरिक्त आयात शुल्काला युरोपियन महासंघ उत्तर देणार नाही, परंतु त्याला कडाडून विरोध करेल असे लेयेन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्याकडे आमच्यावर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याशिवाय पर्याय नसेल तर युरोपियन महासंघ एकत्रितपणे त्याला कडाडून विरोध करेल, असे युरोपियन महासंघातील सर्वात मोठी अर्थसत्ता असलेला देश जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी म्हटले आहे.
युरोपियन महासंघाने यापूर्वी अमेरिकेला दिला होता दणका
2018 मध्ये अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला युरोपियन महासंघाने सडेतोड उत्तर दिले होते. युरोपियन महासंघानेही अमेरिकेत तयार होणाऱ्या मोटरसायल, बुरबॉनची उत्पादने, शेंगदाण्याचे तेल, जीन्स इत्यादी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लादले होते. दरम्यान, अशा प्रकारे अतिरिक्त आयात शुल्क लादल्याने उत्पादनांच्या साखळीवर तसेच व्यापार आणि गुंतवणुकीच्या करारावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे युरोपियन युनियनच्या आयोगाचे उपाध्यक्ष मारोस सेफकोव्हीक यांनी म्हटले आहे.