कामात दिरंगाई सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक व पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पदावरून एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे पालक सचिवही जिल्ह्यांकडे फिरकलेले नाहीत. अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या या निष्क्रियतेवर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी आज नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय कामात अजिबात दिरंगाई सहन करणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी या सचिवांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित सचिवांनी त्वरित जिल्ह्यांत जाऊन अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश दिले.