![Vintage Car](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Vintage-Car-696x447.jpg)
गुरूग्राममध्ये 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विंटेज कारचा मेळा होणार आहे. या प्रदर्शनात 125 हून अधिक जुन्या कार आणि 50 विंटेज बाईक्स दिसणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची सुरुवात दिल्लीच्या इंडिया गेटपासून अँम्बिएन्स ग्रीन्स, गोल्फ कोर्स, गुरूग्रामपर्यंत एका रॅलीने सुरुवात होईल. विंटेज कार सोबत या ठिकाणी कथक, भरतनाट्यम, कथकली सह राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणामधील लोकनृत्यू सादर केले जातील. या रॅलीमध्ये रोल्स रॉयस, बेंटले, कॅडिलॅक, फोर्ड आणि एस्टन मार्टिन सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या कारचे प्रदर्शन केले जाईल.