आयफोन 16 ला मिळणार एआय अपडेट

आयफोन 16 सीरीज गेल्या वर्षी लाँच करण्यात आली. अॅपलने काही दिवसांपूर्वी आयओएस 18.3 अपडेट जारी केले. यातील फीचर्स अमेरिकेतील यूजर्संना मिळाले. परंतु, हिंदुस्थान आणि चीनमधील यूजर्स पर्यंत पोहोचले नाही. परंतु, आता पुढील आठवड्यात हे अपडेट हिंदुस्थानातील यूजर्सला मिळण्याची शक्यता आहे. कंपनी बीटा व्हर्जन लाँ चकरणार आहे. यात यूजर्सला ऑन स्क्रीन अवेयरनेस, अॅप अॅक्शन्स, एन्हान्स्ड पर्सनायलेशनसारखे अपडेट मिळतील. तसेच सीरीचे नवीन व्हर्जन सुद्धा येण्याची शक्यता आहे. नवीन सीरीज अपडेट फ्रान्स, जर्मनी, इटालियन, पोर्तुगाल, स्पॅनिश, जपानी, कोरियन, चायनीज, हिंदी आणि सिंगापूर भाषेला सपोर्ट करेल.