![monalisa bhosle](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/monalisa-bhosle--696x447.jpg)
महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आली आहे. मोनालिसा लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय मोनालिसाकडे एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडने जाहीरातीसाठी संपर्क केला आहे. यासाठी तिला 15 लाखांचे मानधन दिले जाणार आहे. चित्रपटासाठी 21 लाख रुपये देण्यात आले असून मोनालिसाला एकूण 36 लाख रुपये मिळाले आहेत. महाकुंभातून परतल्यानंतर मोनालिसा यूट्यूबवरही सक्रिय झाली आहे. ती या ठिकाणी व्हिडीओ बनवत आहेत. तिच्या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे.