![linkdin](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/linkdin-696x447.jpg)
जॉब सर्च प्लॅटफॉर्म लिंक्डइन अॅप डाऊन झाल्याने हजारो यूजर्सने वेबसाईट आणि अॅप मध्ये येत असलेल्या समस्यांची तक्रार केली आहे. लिंक्डइन यूजर्सच्या 82 टक्के वेबसाईटला समस्यांचा सामना करावा लागत असून 17 टक्के अॅपमध्ये अडचण येत असल्याचे यूजर्सनी म्हटले आहे. डाऊनडिटेक्टरवर 1100 हून अधिक यूजर्संनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक यूजर्स हे वेबसाईट आणि अॅपमध्ये लॉगइन करू शकत नव्हते. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला आहे.