![vaibhav naik 1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/vaibhav-naik-1-1-696x447.jpg)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांना मंगळवारी पत्नीसह चौकशीसाठी रत्नागिरीतील कार्यालयात बोलावले होते. याबाबत त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्याप्रमाणे वैभव नाईक पत्नीसह रत्नागिरीतील एसीबीच्या कार्यालयात उपस्थित झाले होते. गेली अडीच वर्ष माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात मंगळवारी सकाळी माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी चौकशीसाठी उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, गेली अडीच वर्ष माझी चौकशी सुरू आहे.आता त्यांनी नवीन फॉरमॅट मध्ये माहिती मागवली आहे. आता अधिकारीही बदलले आहेत. त्यामुळे त्यांनी मागितलेल्या सर्व माहितीसह आज आपण चौकशीला उपस्थित झालो आहोत. मी 1996 पासून आयकर भरत आहे. त्यांनी गेल्या 20 वर्षांतील सर्व माहिती मागितली होती, ती दिली आहे. मी विधानसभेच्या चार निवडणूका लढवल्या आहेत. त्यावेळी विवरणपत्रात आपण सर्व माहिती दिली असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.