![Mumbai (3)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mumbai-3-696x447.jpg)
मुंबई आणि हरयाणा संघांमध्ये पार पडलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने हरयाणाचा धूळ चारत सेमी फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री मारली आहे. दुसऱ्या डावात रॉयस्टन डायसने भेदक मारा करत हरयाणाचा अर्धा संघ तंबुत धाडला. त्यामुळे हरयाणाचा संपूर्ण संघ 201 धावांमध्ये बाद झाला आणि मुंबईने 152 धावांनी विजय साजरा केला.
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात शम्स मुलानी (91 धावा) आणि तनुष कोटीयन (97 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 315 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हरयाणाला फक्त 301 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या होत्या. मुंबईने आपली आघाडी कायम ठेवत दुसऱ्या डावात 339 धावा केल्या. परंतु डायसने केलेल्या भेदक माऱ्यामुळे हरयाणाला दुसऱ्या डावात फक्त 201 धावांपर्यंत मजल मारता आली.