![us bus accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/us-bus-accident-696x447.jpg)
अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडक देत दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ही घटना घडली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 53 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस 30 वर्षे जुनी होती. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर पुलावरून दरीत कोसळली. यात 55 जणांना प्राण आपले गमवावे लागले. दरीतून 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये 36 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासनाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त बस ग्वाटेमालाच्या राजधानीच्या ईशान्येकडील प्रोग्रेसो येथून आली होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाःकार उडाला.