![neehar (95)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-95-696x447.jpg)
प्रत्येक पालकांना मुलांना क्वालिटी टाईम देणे शक्य नसते. परंतु काही साध्यासोप्या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकाल. आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत आपण सर्वचजण तारेवरची कसरत करत असतो. अशावेळी अनेकदा आपण लहान मुलांना वेळ देण्यात कमी पडतो. आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. मुलांमधील आणि पालकांमधील संवाद हरवत चालल्यामुळे मुले एकाकी पडू लागली आहेत. त्यामुळेच पालकांनी मुलांना वेळ देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-96.jpg)
सध्याच्या घडीला आई वडिल हे दोघेही कामावर जात असल्याने, त्यांना मुलांसाठी वेळ देणं हे खूप कठीण झालेले आहे. अशावेळी मुलांना समजून घेणं तर सोडाच, त्यांच्याशी साधा नीट संवादही साधता येत नाहीये. मुलांना वेळ देताना पालकांची दमछाक होऊ लागली आहे. या सर्व घडामोडीत मुलं एकाकी पडू लागली आहेत. त्यामुळेच आता मुलांच्या प्रश्नांवर पालकांनी आता जागृत होणं हे खूप गरजेचे आहे.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-97.jpg)
मुलांसोबत क्वालिटी टाइम घालविण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे जाणुन घेऊया.
घरात असताना मुलांसोबत वेळ घालवा. पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी करा. त्यामुळे मुलं तुम्हाला त्यांनी दिवसभरात केलेल्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगू शकतील.
सुट्टीच्या दिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा. जेवढे शक्य होईल तेवढे तुमच्या मुलांसोबत खेळा. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना बोलते करा.
तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही सहभागी करून घ्या.
तुमच्यासोबत मुलांनाही मॉर्निग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांना चांगल्या सवयी लागतील. तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहील. शिवाय तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.