![crime](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/09/crime--696x447.jpg)
मुंबईतील वांद्रे येथे वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महिलेचे हात बांधले होते तर गळ्यावर वार करण्यात आलेत. वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. रेखा खोंडे असे 64 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
वांद्रे पूर्वेला रिक्लेमेशनजवळील कांचन इमारतीत राहत्या घरात रेखा कोंडे या मृतावस्थेत आढळल्या. रेखा यांच्या गळ्यावर वार करण्यात आला असून हात बांधलेले होते. तीन ते चार दिवसापूर्वी रेखा यांची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. रेखा यांची हत्या कुणी आणि कोणत्या उद्देशाने केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.