![oshiwara fire](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/oshiwara-fire-696x447.jpg)
जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लेवल 2 ची ही आग असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ओशिवरा येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील फर्निचर मार्केटमधील गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलीस यांच्या आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.