![ravi shastri (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/ravi-shastri-1-696x447.jpg)
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ धोकादायक ठरू शकतो. 1996 च्या विश्वचषकानंतर प्रथमच पाकिस्तानकडे आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला घरच्या परिस्थितीचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱया पाकिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही, असा सल्ला हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी दिला आहे.
एका मुलाखतीदरम्यान रवी शास्त्राr यांनी चॅम्पियन्स स्पर्धेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. जेव्हा तुम्ही उपखंडात घरच्या मैदानावर खेळता तेव्हा नेहमीच दबाव असतो. मग तो हिंदुस्थान, श्रीलंका, बांगलादेश असो किंवा पाकिस्तान, अपेक्षा जास्त असतात. घरच्या वातावरणात पाकिस्तान बाद फेरीनंतर नक्कीच धोकादायक ठरू शकतो. पाकिस्तानमध्ये प्रतिभावान फलंदाज आणि गोलंदाज असल्याने त्यांचा घरच्या परिस्थितीत सामना करणे नक्कीच आव्हानात्मक असेल.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगनेही शास्त्राRच्या मताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी या स्पर्धेत निर्णायक ठरू शकते. सईम अयुबची अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवेल, पण पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी चांगली आहे. शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह कोणत्याही फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. फलंदाजीला बळकटी देण्यात बाबर आझम आणि रिझवान हे महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत पॉण्टिंगने व्यक्त केले आहे. जर पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी केली तर ते नक्कीच स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, असे ही पॉण्टिंग म्हणाला.
पाकिस्तान ः मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.