Photo Gallery- ‘स्मार्ट सिटी’ पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाची दुरावस्था, सर्व ठिकाणी फक्त धुळीचे आणि घाणीचे साम्राज्य..

पाण्याचा थेंबही नसलेली पाणपोई, आसनव्यवस्थेच्या निखळलेल्या फरशा, राडारोडा आणि कचऱ्याच्या ढिगांनी माखलेलं आवार, फुटलेलं ड्रेनेज, तुटलेल्या होर्डिंगचा सांगाडा, अन् पाहावे तिकडे अस्वच्छताच अस्वच्छता ! ही दैना आहे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाची. शहराचं नाक असलेल्या या स्थानकात रोज हजारो प्रवाशांची ये-जा असते; पण ती नाक धरूनच ! आवारात बिनदिक्कतपणे घुसखोरी करणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रवाशांना सोसावा लागणारा उद्दामपणा न्याराच ! ही स्थिती बदलून आम्हाला सोयीसुविधा मिळणार का? असा सवाल आता प्रवासी करत आहेत. (फोटो- चंद्रकांत पालकर)