शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोय यांचे अल्पशा आजाराने बेणसे-झोतीरपाडा या मूळ गावी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रभा, दोन मुले सागर आणि सौरभ, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सुरेश भोय यांच्या पार्थिवावर झोतीरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी येत्या गुरुवारी होणार असून उत्तरकार्य शनिवारी राहत्या घरी पार पडणार आहे. सुरेश भोय हे रायगड जिह्यात सुदाभाई नावाने परिचित होते. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत त्यांनी विविध पदांवर काम केले.