मुंबईत वाघाटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ वाघाटीची तीन देखणी पिल्ले

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ समजली जाणारी वाघाटीची तीन देखणी पिल्ले आणण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही वाघाटीची पिल्ले कोल्हापूरमधील एका शेतकऱ्याला ऊसतोडणीदरम्यान आढळली होती. मात्र त्यांची आई न सापडल्याने ही पिल्ले बोरिवली येथील नॅशनल पार्कच्या स्वाधीन  करण्यात आली. दरम्यान, वाघाटी दुर्मिळ असल्याने त्यांचे ब्रीडिंग सेंटर नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. विनया जंगले यांनी दिली. रस्टी स्पॉटेड पॅट म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या वाघाटीची  पिल्ले सुमारे दीड किलो वजनाची आहेत.