पार्किंग, क्लब हाऊस नको असतानाही पैसे आकारले; म्हाडाचा बिल्डरला दणका

पार्किंग, क्लब हाऊस या सुविधा नको असतानाही बिल्डरने याठी पैसे आकारले. यासंदर्भात विजेत्याच्या तक्रारीनंतर म्हाडाने संबंधित बिल्डरला जाब विचारला. त्यानंतर बिल्डरने विजेत्याचे दीड लाख रुपये कमी केले आहेत.

म्हाडाच्या सोडतीत खासगी बिल्डरकडून प्राधिकरणाला मिळालेल्या 20 टक्के योजनेतील घरांचा देखील समावेश करण्यात येतो. खासगी बिल्डरांची घरे कमी किमतीत मिळत असल्याने या घरांवर अर्जदारांच्या उड्य़ा पडतात. मात्र, विविध सुविधांच्या नावाखाली बिल्डर विजेत्यांकडून पैसे उकळतात.कोकण मंडळाच्या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेत विजेते ठरलेल्या मोहम्मद खान यांना पार्किंग, क्लब हाऊसची सुविधा नको असताना बिल्डरने त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीसह वाढीव शुल्क आकारले. यासंदर्भात दाद मागण्यासाठी त्यांनी म्हाडाच्या लोकशाही दिनात अर्ज केला. सोमवारी पार पडलेल्या लोकशाही दिनात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तात्काळ बिल्डरला पह्न करून आकारलेले वाढीव शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बिल्डरने दीड लाख रुपये  कमी केल्यामुळे अर्जदाराला दिलासा मिळाला.