भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एक पक्ष उभा राहील, असे वक्तव्य नुकतेच केले. यासंदर्भात बोलताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांनी नवा पक्ष काढण्याची ऑफर आपल्याला दिली होती, असे स्पष्टपणे सांगितले.
छगन भुजबळ म्हणाले की, मला गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, भुजबळ साहेब, आपण एक वेगळा पक्ष काढू. मला स्वतः ते म्हणाले होते. तुम्ही, मी, गणपतराव देशमुख आणि रामदास आठवले आणि आणखीन आपल्याबरोबर येतील. मी पण हो बोललो होतो. यावर एक वेळ नाही, तर दोन वेळा चर्चादेखील झाली होती. मीसुद्धा होकार दिला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले ते मला माहीत नाही. पण त्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की ,एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक त्यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भाजपच्या जन्मापासून काम करून त्यांनी हा पक्ष उभा केला आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.
एका समाजावर पक्ष काढणे कितपत यशदायी?
स्वतंत्र पक्ष काढायचा ते कोणीही काढू शकतो. ज्याप्रमाणे पंकजा मुंडे म्हणत आहेत, त्यानुसार तो मोठा पक्ष असू शकतो. पण माझे एक म्हणणे आहे की, एका समाजावर पक्ष काढणे आणि त्यामध्ये यश मिळवणे ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही, मग तो कोणताही समाज असो. त्यांनी काही अभ्यास केला असेल. पण त्यांनी म्हटले म्हणून लगेचच त्या पक्ष काढतील असे मला वाटत नाही. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे त्यांचे म्हणणे