एका टाचणीने मरणाच्या दारातून परत आणले; हृदयविकार, पार्किन्सन, पक्षाघात, ब्रेन हॅमरेजला हरवणाऱ्यांची कहाणी

2017 ची ती भयानक रात्र… हृदयविकाराचा जीवघेणा आणि अ‍ॅक्युट दम्याचा झटका… सहा दिवस कोमात… सातव्या दिवशी थोड्या शुद्धीत आल्या. डॉक्टरांनी सांगितले बायपास शस्त्रक्रिया केली नाही तर 15 दिवसांचेच आयुष्य आहे. बोरिवलीतील गोराईच्या रहिवाशी रंजन देवेंद्र पंड्या (65) सांगत होत्या. शस्त्रक्रिया करायची नसल्याने अ‍ॅक्युपंक्चर पद्धतीने 7 महिने उपचार करून घेतले. गेल्या 8 वर्षांपासून त्यांना हृदयाचा किंवा दम्याचा कोणताही त्रास नाही… अक्षरशः मरणाच्या दारातून त्या परत आल्या. ही किमया करून दाखवली एका टाचणीने.

अशाचप्रकारे पार्किन्सन, पक्षाघात, ब्रेन हॅमरेजपासून ते अगदी व्हर्टिगो, खांदा, कंबर, गुडघेदुखी कोणताही त्रास असो… अनेक रुग्ण कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय पूर्णपणे बरे होऊन छान आयुष्य जगताहेत. अ‍ॅक्युपंक्चरिस्ट  डॉ. प्रदीप देशमुख हे अनेक रुग्णांच्या आयुष्यात देवदुतासारखे आले. त्यांच्या अ‍ॅक्युपंक्चर थेरपीमुळे शेकडो रुग्णांचे करोडो रुपये वाचले आहेत. रंजनबेन यांचे पती देवेंद्र पंड्या (70) हेदेखील मरणाच्या दारातून परत आले. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता.

40 वर्षांपासूनची रुग्णसेवा

डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी 1985 सालापासून अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीने उपचार सुरू केले. त्यानंतर ते अ‍ॅक्युपंक्चर शास्त्र शिकले. वांद्र्यात राहात असताना बँकेत नोकरी करता करता सहकारी व बाहेरील रुग्ण पाहायला सुरुवात केली. युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या फिरोजशाह रोड येथील इमारतीत, फोर्ट येथे सहाव्या मजल्यावरील कँटीनमध्ये डॉ. देशमुख रुग्णांवर उपचार करायचे. आज वसई-विरार व पालघरपासून व अगदी बदलापूरपासून रुग्ण येतात.

पाय पहिल्यासारखे झाले

पाय काळे पडलेले. सगळीकडे जखमा… त्यातून पाणी यायचे. तपासणी केली तेव्हा इन्क्युरेबल अल्सरचे निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु, शस्त्रक्रिया करून घ्यायचीच नव्हती. लाखो रुपये खर्च येणार होता. अशातच डॉ. प्रदीप देशमुख देवदुतासारखे भेटले. त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर काळे पडलेले पाय पुन्हा पहिल्यासारखे झाले. जखमा बऱ्या झाल्या. असा अनुभव सांगितला 75 वर्षीय डॅनी मेनेझीस यांनी दिले.

  • डॉ. देशमुख यांनी सुपर कॉम्प्युटर बनवणारे पद्मश्री, पद्मभूषण विजय भाटकर यांच्यावर
  •  तसेच डॉ. भारती आमटे यांच्यावरही उपचार केले आहेत.
  • मधुमेह झालेल्या रूग्णांनाही डॉ. देशमुख यांनी पूर्णपणे बरे केले आहे.
  • गँगरीन झालेले रुग्णही हातापायाची बोटे न कापता पूर्णपणे बरे केलेले आहेत.
  • 85 टक्के जोडप्यांना या उपचारपद्धतीमुळे मुलं झाली आहेत.
  • बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर शस्त्रक्रिया टाळणे शक्य आहे.
  • मासिक पाळीत अंगावरून पांढरे जाते. अशावेळी ही उपचारपद्धती  फायदेशीर ठरते.