व्हॅलेंटाईन डेनिमित्त क्रेडिट कार्डवर ऑफर्स

व्हॅलेंटाईन डेनिमित्त क्रेडिट कार्डस्वर खास ऑफर्स आणि डिस्काऊंट दिला जात आहे. ही ऑफर शॉपिंग, डायनिंग, ट्रव्हल्स आणि मनोरंजनवर दिली जात आहे. ज्या क्रेडिट कार्डवर ऑफर दिली जात आहे. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय, कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डचा समावेश आहे. तसेच डीबीएस बँक, एचडीएफसी बँक, वन कार्ड क्रेडिट कार्ड, येस बँक क्रेडिट कार्डवरसुद्धा ऑफर्स मिळत आहेत. कमीत कमी 10 हजारांच्या खरेदीवर अडीच हजारांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.