![AI watermark](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/AI-watermark-696x447.jpg)
जगभरात एआयचा वापर वाढला आहे. एआयने बनवलेला फोटो आणि एडिट केलेला फोटो एकसारखाच वाटत आहे. त्यामुळे गुगलने आता एआयने बनवलेल्या फोटोवर डिजिटल वॉटरमार्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासंबंधी घोषणा केली आहे. मॅजिक एडिटरमध्ये रीइमॅजिन टूलने एडिट केलेल्या फोटोवर डिजिटल वॉटरमार्क लावला जाईल. यासाठी गुगल सिंन्थआयडी टेक्नोलॉजीचा वापर करेल. जो आधी इमॅजेन टूलमध्ये केला जात असे. यामुळे एआयने बनवलेला फोटो ओळखणे सोपे होईल. सिंन्थआयडी टेक्नोलॉजीचा वापर गुगलच्या वर्टेक्स एआय ग्राहकांसाठी इमॅजिन 3 आणि इमॅजिन 2 सारख्या इमेज मॉडल्समध्ये केला जातो. हे टेक्नोलॉजी इमेजएफक्स आणि गुगलच्या व्हिडीओ मॉडलला लागू होईल.
सध्या व्हिडीओ एफएक्सवर काही निवडक क्रिएटर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. गुगलने हेही स्पष्ट केलेय की, जर री–इमेजिन टूलवरून करण्यात आलेली एडिटिंग खूपच किरकोळ असेल. बॅकग्राऊंडमध्ये एका छोटय़ा फुलांचा रंग बदलणे यासाठी युजर्स अबाऊट धीस इमेज या फीचरचा वापर करू शकतील. यावरून हे स्पष्ट होईल की, सिंन्थआयडी वॉटरमार्क आहे की नाही.