रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; मागण्यांसाठी पंचायत समितीवर धडक

रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेले दोन महिने पगार झालेला नाही. पगार न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार रखडल्यामुळे हे ग्रामपंचायत कर्मचारी रत्नागिरी पंचायत समितीवर धडकले.

पगार न झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने रत्नागिरी पंचायत समितीच्या आवारात उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून अजूनपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार का काढला नाही याबाबत जाब विचारला. पैसे आलेले असताना पगार का काढला नाही याच्याबाबत विचारणा करून तात्काळ पगार काढा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.