25 सेकंदात 18 वेळा कानाखाली मारली, मुख्याधापकाने गणिताच्या शिक्षकाला चोपले; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर तर काही व्हिडीओ हे गंभीर स्वरुपाचे असतात. असाच एक मजेशीर आणि गंभीर स्वरुपाचा व्हिडीओ गुजतरातमधील एका शाळेतील मुख्याधापक आणि शिक्षकाचा व्हायरल झाला आहे. मुख्याधापकाने गणिताच्या शिक्षकाला जबर मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडीओ गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील नवयुग शाळेतील आहे. मुख्याधापकाचे नाव हितेंद्र ठाकूर असून शिक्षकाचे नाव राजेंद्र परमार आहे. राजेंद्र परमार काही सहकाऱ्यांसोबत मुख्याधापकांच्या रुममध्ये बसले होते. याच दरम्यान राजेंद्र परमार आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात काही कारणांवरून वाद झाला आणि वादाचे रुपांतार हाणामारीत झाले. व्हिडीओ सोशल मीडियार जोरादर व्हायरल झाला आहे. याप्रकरणाची जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.