![Rahul roy](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Rahul-roy-696x447.jpg)
बॉलीवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एककाळ गाजवला. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. एवढेच नाही तर मोठमोठ्या कलाकारांना मागे टाकले. अशाच इंडस्ट्रीतल्या एका अभिनेत्याविषयी जाणून घेऊया.या अभिनेत्याने 90 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात गोविंदासारखे अनेक स्टार बॉक्स ऑफिसवर राज्य करायचे, पण या अभिनेत्याने त्याच्या जबरदस्त पदार्पणाने सर्वांना टक्कर दिली. मात्र त्यानंतर तो सुपरस्टार होऊ शकला नाही तर तो मोठा फ्लॉप हिरो ठरला. 47 सिनेमांमध्ये काम करुनही त्याला यश मिळू शकले नाही.
हा अभिनेता म्हणजे 1990 मध्ये ब्लॉकबस्टर सिनेमा’आशिकी’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता राहुल रॉय. आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल त्याच्या पहिल्याच सिनेमाने रातोरात सुपरस्टार झाला. महेश भट्ट दिग्दर्शित या सिनेमात त्याने अनु अग्रवालसोबत काम केले होते. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि त्यातील गाणीही तेवढीच सुपरहिट ठरली. राहुल रॉयचा लूक आणि अभिनय लोकांना आवडला. तो इतका प्रसिद्ध झाला की बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या यादीत त्याचे नाव सामील होऊ लागले. राहुलने वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी प्रचंड स्टारडम मिळवले होते. मात्र दुर्देवाने ‘आशिकी’सिनेमानंतर त्याचा एकही सिनेमा चालला नाही. आशिकीनंतर त्याला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या आणि एकेकाळी त्याने फक्त 11 दिवसांत 47 सिनेमा साइन केले होते. ज्यामध्ये ‘गजब तमाशा’,’फिर तेरी कहानी याद आयी’,’गुमराह’,’नसीब’ सारखे सिनेमा होते. पण यापैकी कोणताही सिनेमाबॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला घसरण लागली आणि फ्लॉप कलाकारांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले.
‘आशिकी’ हा सिनेमाकेवळ राहुल रॉय साठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीसाठीही एक ऐतिहासिक सिनेमा ठरला. या सिनेमाने अनेक विक्रम मोडले आणि त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक बनला.त्याच्या अभिनयाचे चाहते वेडे होते. मात्र काही वर्षानंतर हळूहळू इंडस्ट्रीतून तो गायब झाला. ‘आशिकी’ सिनेमाची गाणीही प्रचंड हिट झाली. त्यावेळी या सिनेमाच्या संगीत अल्बमचे 2 कोटींहून अधिक युनिट्स विकले गेले होते, जे त्या काळातील एक विक्रम होते. त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केले, पण त्या सिनेमांमधून तो आपल्या अभिनयाची छाप पाडू शकला नाही. ‘आशिकी’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि संस्मरणीय सिनेमा ठरला. राहुल रॉयच्या इतिहासातच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासातही या सिनेमाचे विशेष स्थान आहे.