![aligarh](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/aligarh-696x447.jpg)
अलीगढ येथील मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) कथित ‘बीफ बिर्याणी पार्टी’वरून वादंग निर्माण झाला आहे. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एएमयूमध्ये बीफ बिर्याणी पार्टीसाठी आमंत्रण देण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये ज्याची नोटीस व्हायरल होत आहे. याबाबत हिंदू संघटनांनी त्यावर तीव्र आक्षेप घेत कुलगुरूंवर कारवाईची मागणी केली असून हिंदूंच्या श्रद्धेशी कोणालाही छेडछाड करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशाराच हिंदू नेत्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत हिंदू विद्यार्थ्याच्या म्हणण्यांनुसार, या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन दोषींवर त्वरीत कारवाई करावी. ही बाब श्रद्धेशी संबंधित आहे. कोणीही डायनिंग हॉलमध्ये गोमांस वाढू शकेल तर हा गैरसमज आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. आम्ही त्याचा निषेध करु. या प्रकरणी विद्यापीठाचे प्रॉक्टर प्रोफेसर मोहम्मद वसीम अली म्हणाले की, सुलेमान हॉलच्या मेनूमध्ये बदल करण्याबाबत माहिती जारी करण्यात आली होती. ती एक प्रकारची टायपिंग चूक होती. मेनूमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जेवण पूर्वीप्रमाणेच दिले जाईल. ही नोटीस सीनियर फूड डाइनिंग हॉलकडून जारी करण्यात आली होती. सध्या सूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी 20 स्वतंत्र वसतिगृहे आहेत. येथे दिवसातून तीन वेळा जेवण दिले जाते. शनिवारी विद्यापीठाच्या सुलेमान हॉलमधील जेवणाच्या मेनूबाबत इंग्रजीत नोटीस बजावण्यात आली. काही वेळातच त्या नोटीसचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात सिनियर फूड डायनिंग हॉलचे मोहम्मद फैजउल्लाह आणि मुजस्सिम अहमद भाटी यांची नावे नमूद आहेत. इंग्रजीत लिहिले आहे की ‘रविवारच्या जेवणाचा मेनू मागणीनुसार बदलण्यात आला आहे.’