आधी विवाहित प्रेयसीची हत्या, मग मृतदेहावर केला बलात्कार; नागपुरातील धक्कादायक घटना

नागपूरमध्ये माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित प्रेयसीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहावर बलात्कारही केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीय आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीला देखील अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश टेकाम (25) असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना नागपूरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. एक 32 वर्षीय महिला आपला नवरा आणि मुलीसह हुडकेश्वर खुर्दमध्ये राहायची. तिचा नवरा कामानिमित्ता सकाळी घराबाहेर पडल्यानंतर थेट रात्री घरी परतायचा. त्यामुळे ही घरात एकटीच असायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला दारूचे व्यसन होते.

दरम्यान, आरोपी रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री होता. दोन वर्षांपूर्वीच तो कामानिमित्त नागपूरात आला होता. तेव्हाच या दोघांची ओळख झाली आणि त्यातूनच त्यांचा एकमेकांवर जीव जडला. यानंतर ते एकमेकांना भेटू लागले. गुरूवारी संजनाने रोहितला भेटायला बोलावले होते. येताना दारूची बाटली देखील आणण्यास सांगितले. संजनाचा नवरा घरी नसल्याचे पाहून रोहित घरी आला. यानंतर त्यांनी दारू पिऊन जेवणही केले. दोघेही नशेत असताना रोहितने संजनाजवळ शारिरीत संबंधांची मागणी केली. मात्र संजनाने यासाठी निकार दिला. त्यामुळे रोहितने तिला मारहाण केली. तरीही संजना त्याला सातत्याने नकार देत होती.

रोहितचा राग अनावर झाला आणि त्याने संजनाच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. मात्र एवढे करूनही नराधमाचे मन स्थिरावले नाही. यानंतर त्याने संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि तेथून पळून गेला. संध्याकाळी संजनाची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यासंदर्भात हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी रोहितला देखील अटक करण्यात आली आहे.