आंतरराष्ट्रीय सर्कस नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे नोंदवणारी जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कस पुण्यात सिंहगड रोड येथे फनटाईम थिएटरच्या मागील मैदानावर शनिवारी सुरू झाली. रोज दुपारी 4.30 आणि सायंकाळी 7.30 असे शो होणार असून, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दुपारी 1.30, 4.30 व सायं. 7.30 असे 3 शो होतील. तीन वर्षांखालील बालकांना प्रवेश मोफत आहे. तसेच अपंग, अंध, मतिमंद मुलामुलींच्या संस्थांनी संपर्क साधल्यास त्यांना मोफत सर्कस दाखवली जाईल. सैनिकांच्या कुटुंबीयांना देखील सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी दिली.